
नाणीज ग्रामपंचायतीतर्फे दाखले देण्यासाठी कॅम्प
रत्नागिरी : नाणीज ग्रामपंचायतीतर्फे ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून ३०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी मंगळवार दि. ६ जून रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची चांगली सोय झाली. एकाच दिवशी, एकाच छताखाली सर्वांना दाखले मिळाले.
पालकमंत्री उदय सामंत, किरण उर्फ भैया सामंत, अण्णा सामंत, मा. तहसीलदार यांचा मार्गदर्शनाखाली दिनांक 06 जून रोजी नाणीज ग्रामपंचायत कार्यालय येथे शासन आपल्या दारी या संकल्पनेतून शैक्षणिक वर्ष सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाणीज गावचे सरपंच गौरव संसारे उपसरपंच संध्या गुरव, ग्रामपंचायत सदस्य विनायक शिवगण, दत्ताराम शिवगण, पूजा पंडित, अनुजा सरफरे, संजना रेवाले, विजय गावडे, तलाठी चौघुले, ग्रामसेवक आशिष खोचाडे रत्नागिरी सेतू येथील कर्मचारी पोलिस पाटील नितीन कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताराम खावडकर, माजी तहसीलदार एम. बी कांबळे बचत गट महिला , सीआरपी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, नाणीज, खानु,कशेळी गावचे ग्रामस्थ बंधू भगिनी, विध्यार्थी मित्र तसेच कर्मचारी उपस्थित होते.