
कोर्लेतील सिद्वांत अधटराव रणजीच्या संभाव्य संघात
सिद्धांतवर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव
रत्नागिरी :मुंबई रणजी संघाच्या निवडीसाठी पुढील आठवड्यात निवडपूर्व अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संभाव्य 35 खेडाळूूंची निवड करण्यात आली असून त्यामध्ये 15 क्रमांकावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा कोर्ले येथील सिद्वांत अधटराव याचा समावेश झाला आहे. रणजी संभाव्य संघात निवड झाल्याबद्दल सिद्धांत अधटराव याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
मुंंबई रणजी संघासाठी 35 खेळाडूंची शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये भारतीय टिमचा कॅप्टन रोहित शर्मा, आक्रमक खेळाडू सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. राजू कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने यांची निवड केली आहे.
लांजा-कोर्ले येथील सिद्वांत अधटराव हा उत्कृष्ट खेळाडू असून त्याने यापूर्वी चांगला खेळ केला आहे. खेळातील सराव व मेहनत त्याच्या आत्मविश्वासामुळेच त्याने संघात जाण्याच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहचण्यात यश मिळविले आहे. संभाव्य संघ पुढीलप्रमाणे रोहित शर्मा, पृथ्वी साव, यशस्वी जायसवाल, भूपेन लालवानी, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, सरफराज खान, शिवम दुबे, अरमान जाफर, जयेश पोखरे, प्रणव केला, हार्दिक तमोरे, प्रसाद पवार, सिद्धांत अधटराव, शार्दुल ठाकुर, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रायस्टन डायस, हर्ष तन्ना, शम्स मुलानी, तनुश कोटियन, विजय गोहिल,
धुमिल मटकर, खिजर दफेदार, परिक्षित वलसांगकर, सिल्वेस्टर डिसूजा, सक्षम झा, अमन खान, साईराज पाटिल, सुजीत नायक, आदित्य धूमल, शशांक अटारडे, आतिफ अत्तरवाला यांचा समावेश आहे.