
चिपळुणातील अपघात प्रकरणी
अज्ञात कारचालकावर गुन्हा
चिपळूण :पालकासमवेत तरुणी शहरातील बहाद्दूरशेख नाक्याच्या दिशेने चालत जात असताना भरधाव अज्ञात कारने तिला धडक दिल्याची घटना 12 मे रोजी चिपळूण-कराड मार्गावरील खेर्डी-माळेवाडी येथे घडली होती. या अपघातानंतर कार चालक न थांबता निघून गेला होता. याप्रकरणी रविवारी त्या कारचालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुग्धा प्रसाद सावंत असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.