
रत्नागिरीतील रेल्वे रूळावर आढळला मृतदेह
रत्नागिरी :रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर तरूणाचा मृतदेह आढळून आल़ा. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आल़ी. तरूणाचे अंदाजे वय 30 वर्षे आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े. तरूणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत़.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेचे कर्मचारी सिद्धराम सुरेश कोरे हे 3 जून 2023 रोजी सकाळी रेल्वे रूळाची पाहणी करत होत़े. यावेळी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशननजीक मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर तरूणाचा मृतदेह आढळून आला. त्यानुसार त्यांनी या घटनेची खबर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दिल़ी. या मृतदेहाबद्दल कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आह़े. याप्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भितळे करत आहेत़.