
खेड येथे दुकानात चोरी प्रकरणी अज्ञातावर गुन्हा
खेड:तालुक्यातील भरणे येथील मसाला दुकानातून अज्ञात चोरट्याने 20 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानुसार आज्ञातावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानाच्या लोखंडी दरवाजाला लावलेले कुलूप कोणत्यातरी धारदार हत्याराने कापून चोरट्याने दुकानात प्रवेश करत कपाटात ठेवलेले 20 हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.