
एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयाचा ssc निकाल १००% !
रत्नागिरी :एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्ग दहावी चा निकाल 100% लागला असून रिया मुल्ला 83.60%, मोहतसीन खान 76.20% , व इकरा फारूकी 72.80% गुण संपादन करून अनुक्रमे या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण भागातील शाळा असल्याने शिक्षकांच्या अपार कष्टाने व विद्यार्थ्यांच्या मेहनतीने हे घवघवीत यश मिळविले आहे. या कार्यामध्ये सर्व विषय शिक्षकांची मेहनत आहे. विद्याल्याचा हा निकल विद्यालायची शैक्षणिक गुणवत्ता दर्शवणारा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शाळा म्हणून सर्वत्र परिचय असणार्या शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता अबाधित ठेवली असून विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्या मेहनतीला यश मिळाले असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते यांनी केले. या यशाच्यापाठी संस्था अध्यक्ष सादिक काझी, उपाध्यक्ष डॉ अन्सार जुवळे तत्कालीन लोकल कमीटी अध्यक्ष अफसर खान यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे.