
कोल्हापुरातील धरणात बुडालेल्या तुळसणीतील तरूणाचा मृतदेह सापडला
रत्नागिरी :संगमेश्वर तुळसणीतील तुषार बेर्डे (25, तुळसणी, बेर्डे वाडी) हा कोल्हापुरातील आंबर्डे येथे मित्रांसोबत गेला होता. अंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो आत 40 फूट खोल धरणात बुडाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.
दरम्यान शुक्रवारी सकाळी बुडालेला तुषार बेर्डे याचा मृतदेह शनिवार 3 जून रोजी दुपारी दोन वाजता काढण्यात आला. ज्या ठीकाणी बुडाला होता तिथेच थोड्या अंतरावर पाण्याच्या तळाशी मातीत रुतलेल्या स्थितीत आढलून आला. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. मृतदेह शववि्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, तुषार बेर्डे हा तुळसणी येथील तरुण असून तो आपल्या मित्रांसोबत मुंबई हून गावी फिरण्यासाठी आला होता. मार्लेश्वर, रत्नागिरी अशा ठिकाणी फिरल्यानंतर त्यांनी कोल्हापूर शाहूवाडी येथील आंबर्डे या ठिकाणी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता धरणात पोहण्यासाठी उतरले. मात्र धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी अरडाओरडा केला मात्र काहीच उपयोग झाला नाही. तो पर्यंत तो दिसेनासा झाला होता. याची माहिती तुळसणी येथे समजताच येथील ग्रामस्थ कोल्हापुरात घटनास्थळी दाखल झाले होते.