
चरवेली येथे फिट येऊन 25 वर्षीय तरूणीचा मृत्यू
रत्नागिरी :तालुक्यातील चरवेली नागलेवाडी येथील 25 वर्षीय तरूणीचा फिट आल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी 9 च्या सुमारास घडल़ी. धनश्री विजय कांबळे (25, ऱा चरवेली नागलेवाडी) असे मृत तरूणीचे नाव आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री हिला 29 मे रोजी फिट आली होत़ी. यावेळी नातेवाईकांनी तिला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तिला सातत्याने फिट येत असल्याने नातेवाईकांनी धनश्री हिला उपचारासाठी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल़े. उपचार सुरू असताना 1 जून 2023 रोजी सकाळी 9 च्या सुमारास धनश्री हिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े