
मोदी ॲट नाईन अभियान उपक्रमाची टीम जाहीर
रत्नागिरी : केंद्रात भाजपा सरकार ९ वर्षे सत्तेत आहेत. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर भाजपाने लक्ष्य केंद्रित केले आहे. या अनुषंगाने मोदी ॲट नाईन अभियान देशभरात सुरू झाले आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक म्हणून मंत्री नारायणराव राणे यांची व सहसंयोजक म्हणून प्रमोद जठार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अभियान ३० मे ते ३० जून या कालावधीत चालणार आहे.
महिनाभर केंद्र सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवल्या जाणार आहेत. त्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विकासतीर्थ संयोजक- डॉ. नीलेश राणे, सहसंयोजक सच्चिदानंद उर्फ संजू परब, सचिन वहाळकर, सोशल मीडिया संयोजक- आमदार नीतेश राणे, उमेश कुळकर्णी, धनंजय पाथरे, अभियान प्रारंभ रॅली, व्हिडिओ कॉन्फरन्स संयोजक राजन तेली, सहसंयोजक अनिल उर्फ बंड्या सावंत, जाहीर सभा संयोजक प्रमोद जठार, सहसंयोजक प्रभाकर सावंत, बुद्धिवंत संमेलन- संयोजक ॲड. दीपक पटवर्धन, सहसंयोजक मिलिंद कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन संयोजक- अजित गोगटे, सहसंयोजक ॲड. बाबा परुळेकर, नीलेश तेंडुलकर, संयुक्त मोर्चा संमेलन- संयोजक- संध्या तेरसे, सहसंयोजक राजश्री विश्वासराव, व्यापारी संमेलन संयोजक- महेश सारंग, सहसंयोजक सुशांत उर्फ मुन्ना चवंडे, निशिकांत भोजने.
लाभार्थी संमेलन संयोजक- अतुल काळसेकर, सहसंयोजक- मनोज रावराणे, रणजीत देसाई, रवींद्र मडगावकर, विजय चितळे, प्रमोद अधटराव, मुन्ना खामकर. योग दिन कार्यक्रम संयोजक- लखम राजे भोसले, सहसंयोजक अमित केतकर, घरोघरी संपर्क अभियान संयोजक बाळ माने, सहसंयोजक प्रसन्ना तथा बाळू देसाई, संपर्कातून समर्थन- संयोजक प्रमोद रावराणे, सहसंयोजक सतीश शेवडे.