
नौसीन अहमद काझी यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी निवड
रत्नागिरी:- रत्नागिरीतील सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले तरुण नेतृत्व नौसीन अहमद काझी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्फत रत्नागिरीचे नौसीन अहमद काझी यांची जिल्हा कार्याध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. याचे नियुक्ती पत्र मुंबईच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस कोकणचे नेते तथा रायगड- रत्नागिरी खासदार सुनील तटकरे व युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रदेश प्रांतीक सदस्य बशिर मुर्तूझा ,रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबन कानवजे हे उपस्थित होते.
नौसीन अहमद काझी हे रत्नागिरी शहर परिसरासह तालुक्यात सामाजिक, राजकीय क्षेत्रात गेली बराच काळ कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या निवडीनंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.