
अध्यक्षपदी मुराद अडेरकर तर उपाध्यक्षपदी परवेझ घारे यांची निवड
रत्नागिरी :मुस्लीम अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व या समाजाला मुख्य प्रवाहात आणून एक प्रगल्भ व्यासपीठ निर्माण करणे आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करणे या उद्देशाने मुस्लिम समाज विकास संघ जिल्हा रत्नागिरी या जिल्हा स्तरीय संघटनेची स्थापना करण्यात आली असून तिच्या अध्यक्षपदी चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांची तर उपाध्यक्षपदी परवेझ घारे (लांजा) यांची निवड करण्यात आली आहे.
मुस्लिम समाज हा विविध राजकीय नेत्यांच्या दावणीला न बांधता या समाजाच्या क्षमतांचा विचार करता सामाजिक स्तरावर खूप मोठी मजल मारणे सहज शक्य आहे.या विषयीची सामाजिक जागृती संपूर्ण जिल्ह्याभर करण्यात येणार आहे. समाजाच्या प्रमुख समस्यांवर अभ्यास करून त्या समस्या दूर करणे हे प्रथम कर्तव्य म्हणून कामाला सुरुवात केली जाणार आहे. समाजातील शेवटचा घटक वंचित ठेवण्यात काहींनी धन्यता मानली. समाजातील अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आज ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.परंतू मोठ्या संख्येने वंचित राहिलेल्या युवक,युवती आणि इतर घटकांना प्रगतीचा महामार्ग सापडलेला नाही. व्यापार उदीमातील आदर्श आधुनिकीकरण, शैक्षणिक क्षेत्रातील सुक्ष्म मार्गदर्शन यां पासून आजही अल्पसंख्य मुस्लिमांमध्ये परिवर्तन झालेले नाही. ते होणे ही काळाची गरज आहे.मात्र वंचित राहिलेल्या या घटकांचा सर्वांगीण विकास साधावा या साठी या पुढे नियोजनबद्ध प्रयत्न केले जाणार आहेत.या कार्यात सर्वसामान्य व्यक्तींना प्रवाही करण्याची योजना आखली गेली आहे. अलीकडच्या काळात मुस्लिमांचा राजकीय फायदा करून घेणारांची संख्या वाढत असतानाच नव्याने स्थापन झालेल्या वरील स़ंस्थे मुळे समाजाला जागृत केले जाणार असून समाजाचा वापर आता या पुढे बंद कसा करावा याचेही नियोजन केले गेले आहे.
मुस्लिम युवक युवतींना शैक्षणिक प्रवाहात आणून राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून कार्य करणारी राष्ट्रवादी पिढी निर्माण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या संघटनेची कार्यकारिणी घोषीत करण्यात आली आहे. त्यामध्ये अध्यक्षपदी मुराद अडरेकर ( चिपळूण), उपाध्यक्षपदीपरवेज शंमसुद्दीन घारे लांजा, शब्बीर अब्दुल कादिर तांबे कर्जी खेड, अयुब कापडी.संगमेश्वर देवरुख सचिव/चिटणीसपदी रफिक बिजापुरी रत्नागिरी सहसचिवपदी मजीद पंन्हलेकर,राजापूर, उस्मान अब्दुल्ला मुल्लाजी. गुहागर, खजिनदारपदी जावेद सारंग दापोली, सह .खजिनदारपदी अहमद नाडकर, मंडणगड यांची तर सदस्यपदी महंमद हुसेन मुसा शिरल,चिपळूण, अब्दुल रउफ मोहिद्दिन खतीब.खेड, अमजद बोरकर साखरीनाटे,राजापूर, मन्सूर काझी रत्नागिरी, जावेद मणियार दापोली, सलाउद्दीन शिरगावकर संगमेश्वर देवरुख, शकील चाफेकर, दाभाड मंडणगड, सुहेल मापारी,लांजा, इरफान दळवी, भुरकुंडा गुहागर, इमदाद चौगुले, चिवेली चिपळूण यांची निवड करण्यात आली आहे.