
आज १ वाजता दहावीचा निकाल
रत्नागिरी:- राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेचे निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थांसह पालकांमध्येही उत्सुकता होती. दरम्यान गुरुवारी म्हणजेच 2 जून 2023 रोजी दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे. राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळ https://mahresult.nic.in/ वर जाहीर करणार (10th ssc result 2023 date) असल्याची माहिती मिळाली आहे.