कोकण नगर येथे ब्राउन हेरॉईन बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी: शहरातील क्रांतीनगर येथे गैरकायदा ब्राउन हेरॉईन हा अंमली पदार्थ आपल्याजवळ बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई बुधवार 24 मे रोजी रात्री 8.30 वा.करण्यात आली.
जुबेर अहमद अमिरुददीन खान (45,रा.चर्चरोड वाघळे चाळ,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.बुधवारी शहर पोलिसांना क्रांतीनगर येथे एक जण अंमली पदार्थ बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानूसार शहर पोलिसांनी त्याठिकाणी ही कारवाई केली आहे.संशयिताविरोधात एन.डी.पी.एस अॅक्ट कलम 8 (क),21 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.