
अज्ञात वाहनाच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू
चिपळूण : मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
शांताराम पांडुरंग कांबळे (४५) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. कांबळे हे सावर्डे येथे महामार्ग ओलांडत असताना चिपळूणकडून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहन चालकाने चारचाकी बेदरकारपणे चालवून कांबळे यांना धडक दिली. या त्यांच्या हाता-पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर चालक न थांबता तसाच निघून गेला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला