खेड येथे मांडवी एक्स्प्रेसमधून दोघांचे मोबाईल लंपास
खेड:कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस मधून हजारो रुपये किमतीचे मोबाईल खेड स्थानकामधून गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लांबवले. या अज्ञात चोरट्याने मोबाईल लांबवल्याचा प्रकार २१ रोजी घडला असून या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
खेड स्थानकात आलेली मांडवी एक्स्प्रेस गाडी क्रं १०१०४ मधील कोच क्रं ९ मध्ये शिरत असताना अज्ञात चोरटयाने एका पुरुष प्रवाशाचा ३९ हजार ७९८ रुपये किंमतीचा वन प्लस मोबाईल चोरून नेला. या प्रकरणी पनवेल पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार हा गुन्हा येथील पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आला तर याच दिवशी अन्य एका घटनेत गर्दीचा फायदा घेऊन एका प्रवाशाच्या खिशातील १८ हजार ९९० रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल चोरला गेल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.