
निवे बुद्रुक येथे फांदी तोडताना झाडावरून पडून प्रौढाचा मृत्य
संगमेश्वर:- गुलमोहराच्या झाडावरून तोल जाऊन खाली कोसळल्याने ५२ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथे ही घटना घडली. भास्कर श्रीपत बारगुडे (रा. किरडुवे बारगुडेवाडी, वय ५२ वर्षे) असे मृत प्रौढाचे नाव आहे. भास्कर बारगुडे हे यादव यांच्याकडे मजुरीचे काम करण्यासाठी शनिवारी सकाळी आले होते. बारगुडे हे गुलमोहर झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढले होते. फांदी तोडत असताना तोल जाऊन बारगुडे जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून भास्कर बारगुडे यांना मृत घोषित केले. अधिक तपास महिला पोलीस नाईक क्रांती सावंत करीत आहेत.