कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीवर सचिन वहाळकर यांची पुर्ननियुक्ती
रत्नागिरी :भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर यांची कोकण रेल्वे सल्लागार समितीवर पुन्हा निवड झाली असून तसे पत्र त्यांना रेल्वे कडून प्राप्त झाले आहे.सचिन वहाळकर यांना या समितीवर काम करण्याचा पूर्वानुभव असून त्यांनी कोकण रेल्वे संदर्भातील प्रवासी वर्गाच्या अपेक्षा, मागण्या यांचा पाठपुरावा करुन अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. आता मिळालेल्या कार्यकाळात कोकण रेल्वेवरील छोट्या स्थानकांवरील समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच रेल्वेमध्ये होणारे धोरणात्मक
बदल, यातून प्रवासीवर्गाला असलेल्या अपेक्षा या सर्वांची आपल्यास जाणीव असून त्या अनुषंगाने आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच वेळी रेल्वेची धोरणे ,नियम यासंबंधात प्रवासीवर्गाला अवगत करण्यासाठी तसेच रेल्वे वरील समस्या जाणून घेण्या साठी प्रवांशां बरोबर जास्तित जास्त संवाद साधण्यावर मी भर देणार असून ज्या समस्या कोकण रेल्वेच्या कार्यकक्षे बाहेर आहेत त्यांचाही पाठपुरावा आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपली या समितीवर निवड केल्या बद्दल कोकण रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. सचिन वहाळकर यांची नियुक्ती झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.