
सर्पदंश झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
संगमेश्वर:- विषारी सर्पाने दंश केल्याने जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील शिवणे येथे हा प्रकार घडला.
शिवणे येथे विषारी सर्पाचा दंश झाल्याने अर्चना संतोष भेकरे (५२, रा. शिवणे ता. संगमेश्वर) या महिलेला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना भेकरे गेल्या सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरी जेवण करून झोपी गेल्या होत्या. झोपेत असताना रात्री केव्हातरी त्यांना विषारी सापाने दंश केला. यावेळी त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.