सुभेदार प्रदीप चाळके चॅरिटेबल ट्रस्टचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा
संगमेश्वर:- सुभेदार प्रदीप चाळके चॅरिटेबल ट्रस्टचा पहिला वर्धापन दिन 11 मे ला डिंगणी चाळकेवाडी मध्ये संपन्न झालं त्या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणुन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय जी सामंत साहेब उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणुन मानसिंग राव घोरपडे रत्नागिरी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम. जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रमोद पवार. जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या प्रसंगी 24 शेतकरी लाभार्त्यांना तालुका कृषी च्या माध्यमातून भात बियाणं वाटप करण्यात आलं. जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.ब्लेंकेट वाटप करण्यात आलं.नागरिकांनी समाधान व्यक्त करत ट्रस्ट ला आशीर्वाद दिले.

डिंगणी चे उपसरपंच मिथुन निकम.तसेच मयूर निकम.राजेश चाळके. दीपक चाळके. राकेश चाळके. जयकुमार चाळके.महादेव जाधव.या स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमाला मोलाची साथ दिली.
आलेल्या पाहुण्यांचे ट्रस्ट च्या वतीने अध्यक्ष राजेश धामणे सचिव सुधीर चाळके विश्वस्त विकास चाळके अंकेश चाळके यांनी आभार मानले.