
देवरुखात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
संगमेश्वर : साडवली एकता नगर येथील 82 वर्षीय वृध्दाने आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना घडली.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम लक्ष्मण मणोकर असे आत्महत्या केलेल्या वृध्दचे नाव आहे. शनिवारी सकाळी घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. घरात कोणा नसल्याची संधी साधत मणचेकर यांनी राहत्या घरी नायलॉन साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घरची मंडळी दुपारी घरी आली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या बाबत संतोष मणचेकर याने देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार डी. एस. पवार यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. मणचेकर यांना 6 महिन्यांपूर्वी आजारी होते. यामुळे त्यांना दारूचे व्यसन लागले होते. आजारपणाला कंटाळून व दारूच्या नशेत मणचेकर यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.