
विनापरवाना दारू बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी ः शहरातील मिरकरवाडा व खालची आळी येथे विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री व दारू जवळ बाळगल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमकार वाघेला व सफवान सोलकर अशी संशयितांची नाव आहे. हा प्रकार बुधवारी (ता. १०) सात ते साडेआठच्या सुमारास मिरकवाडा व खालची आळी येथे निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरकरवाडा येथे संशयित वाघेला यांच्याकडे विनापरवाना २५० रुपयांची पाच लिटर दारु पोलिसांनी सापडली. तर संशयित सोलकर यांच्याकडे खालची आळी येथील गडग्याच्या आडोशाला २२० रुपयांची सीलबंद इंग्लीश दारुची बाटली स्वतःकडे बाळगल्यास्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.