
पांढरा समुद्र येथे आढळला नेपाळी खलाशाचा मृतदेह
रत्नागिरी:- शहरानजीकच्या पांढरा समुद्र येथील पायवाटेवर नेपाळी खलाशाचा मृतदेह मिळून आला. याप्ररकणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.ही घटना शनिवार 6 मे रोजी सायंकाळी 5.15 वा.उघडकीस आली.
रुवम कालुराम डगौरा (35,मुळ रा.कैलाली, नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे.याबाबत बोटीला कलरकाम करणार्या कामगाराने शहर पोलिसांना खबर दिली.त्यानूसार,शनिवार 6 मे रोजी दुपारी 12 वा.बोटी कलर करण्याचे काम सुरु असताना त्यांना रुवम कोठेही दिूसन आला नाही.म्हणून त्यांनी आजुबाजुला रुवमचा शोध घेतला असता पांढरा समुद्र येथील दुसर्या पायवाटेवर त्यांना रुवम बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसून आला.फिर्यादी यांनी बोटमालकाच्या मदतीने रुवमला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.