
परशुराम घाटात कोसळली दरड, वाहतूक चिपळूणमार्गे वळवली
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. परशुराम घाटात दरड कोसळली आहे. यामुळे वाहतूक लोटे चिरणी कलंबस्ते मार्गे वळवण्यात आली आहे.
पहाटे कोसळत असलेल्या पावसामुळे दरड खाली आल्याने वाहतूक विस्कळित झाली. मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहने घसरून पडत आहेत. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. जेसीबीच्या साहय्याने युद्धपातळीवर माती हटवण्याचे काम सुरु आहे.