
बेदरकारपणे टेम्पो चालवत अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी :बेदरकारपणे टेम्पो चालवत रस्त्याच्या विरुध्द दिशेला नेत अपघात केल्याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना शनिवार 6 मे रोजी दुपारी 12.15 वा.निवळी ते जयगड जाणार्या रस्त्यावरील चाफे तिठानजीक घडली.
याप्रकरणी टेम्पा चालक श्रीकांत गुलाबराव जाधव (45) याच्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानुसार,शनिवारी दुपारी श्रीकांत जाधव आपल्या ताब्यातील आयशर प्रो 3015 टेम्पो भरधाव वेगाने घेउन निवळी ते जयगड असा जात होता.तो चाफे तिठ्यापासून 200 मिटर अंतराव आला असता त्याचा टेम्पावरील ताबा सूटला.त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या विरुध्द दिशेला जाउन हा अपघात झाला.या अपघतात टेम्पोच नुकसान झाले असून अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.