खेड येथे दुचाकीस्वाराला धडक दिल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा
खेड :मुंबई-गोवा महामार्गावरील गुणदे फाट्यानजीक दुचाकीस्वाराला धडक दिल्याप्रकरणी कारचालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारचालक अंकुश महाजन (34, रा. करीरोड मुंबई) हे एम.एच. 01/डी.आर. 0665 क्रमांकची इर्टिका कार घेवून पनवेलहून चिपळूणच्या दिशेने जात असताना एम.एच.04/के.क्यु. 1977 कर क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दाकीस्वारास दुखापत होवून दुचाकीचे नुकसान झाले. त्यानुसार दाकीस्वाराने दिलेल्या तक्रारीनुसार कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.