तुरळ येथे अपघातात मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू
संगमेश्वर :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरी येथील सभेसाठी निघालेल्या पदाधिकाऱ्यांच्या इनोव्हा (गाडी नंबर एम एच 43 व्ही 9201) गाडीला तुरळ येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे.
देवेंद्र जगन्नाथ साळवी (वय 42 रा. मालगुंड सध्या राहणार बोरीवली मुंबई) असे मृत्यू झालेल्या मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच मनसेचे बाळा नांदगावकर, मनसे उपनेते संदीप देशपांडे, मनसे जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण नंदू फडकले आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच पोलीस ठाण्याचे मौजे तुरळ येथे संगमेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे सचिन कामेरकर, कांबळे, शांताराम पंदेरे, सोमनाथ आव्हाड, विश्वास बरगाले आदी उपस्थित होते.