लोटे एमआयडीसी मध्ये भीषण आग
खेड:- खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीधील एका कंपनीत मोठी आग लागल्याची घटना घडली. नायट्रिक एसिड गॅस गळती झाल्यानं ही आग लागल्याचं सांगण्यात येतंय. आगीमुळे कुणी जखमी झालेलं नाही, मात्र गॅसमुळे काही जणांना त्रास झाल्याची माहिती समोर आलीय. आरोमा इंटरमिजिएट्स असं आग लागलेल्या कंपनीचे ननाव असून नायट्रिक ऍसिड गॅस लिकेज होऊन मोठी आग लागली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नायट्रिक गॅस गळतीनंतर लागलेल्या आगीमध्ये सुदैवाने कोणीही कामगार जखमी नाही. मात्र गुणदे तलारीवाडी येथील पाच ते सहा ग्रामस्थांना गॅसची किरकोळ बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.
आगीमध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग इतकी मोठी होती की दोन किलोमीटर लांबून या आगीच्या धुराचे लोट दिसत होते. नजीकच्या लोक वस्ती मधील लोक देखील मोठ्या प्रमाणावर घाबरले होते एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली असून गॅस लिकेज मुळे झालेल्या या दुर्घटनेमुळे एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे