
रत्नागिरीतील नवनिर्माण शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षारंभ सोहळा
एस. पी. हेगशेट्ये कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट च्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन
रत्नागिरी :रत्नागिरीतील नवनिर्माण शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षारंभ सोहळा आणि एस. पी. हेगशेट्ये कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट च्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक ५ मे रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी एम आय डी सी येथील नवनिर्माण कॉलेजच्या बृहद भारतीय समाज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून उद्योग मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत, जनता दल युनायटेड चे राष्ट्रीय सचिव आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमात अंजुमन इस्लाम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये आदीं प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.