
चिपळुणात दुचाकीची ट्रकला धडक
चिपळुण :चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी येथे भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने उभ्या असलेल्या ट्रकला धडक देऊन अपघात केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला आहे.
महेश गोविंद झुजम (30, पिंपळी बुद्रूक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. झुजम हा चिपळूण-कराड मार्गावरुन दुचाकीने जात होता. तो पिंपळी नाक्याच्या पुढे काही अंतरावर आला असता त्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन दुचाकी भरधाव वेगात चालवून रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे.