
बारशाच्या कार्यकमात बाळाच्या गळयातील दोन सोन्याच्या चेनची चोरी
रत्नागिरी:खालचीआळी येथे चक्क बारशाच्या कार्यकमावेळी बाळाच्या गळ्यातील सोन्याच्या दोन चेन चोरून नेल्याची घटना 26 एपिल रोजी सकाळी 8.30 ते 9.90 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागिरथीभुवन खालचीआळी येथे मुलाच्या बारशाच्या कार्यकमात बाळाच्या गळ्यात घातलेल्या दोन सोन्याच्या चेनी कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. यापकरणी अज्ञातावर भादविकलम 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.