
खासदार विनायक राऊत उद्या घेणार आंदोलनकर्त्यांची भेट.
रत्नागिरी :राजापूर तालुक्यातील बारसू – सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या महिला व पुरुष रखरखत्या उन्हात उष्णतेचे प्रमाण वाढत असतानाही आंदोलन करत आहेत. जिल्हाधिकारी यांना सर्व्हेक्षण रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही सर्वेक्षण सुरू आहे. पोलिसांच्या दडपशाहिने ग्रामस्थांचा विरोध चिरडून विनाकारण ग्रामस्थांना अटक करण्यात येत आहे.
दरम्यान, बारसू – सोलगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत हे उद्या बुधवार दि.२६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता भेट देणार आहेत.