
विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी :तणनाशक प्राशन केलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे समीर पवार (41 रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवार 18 एप्रिल रोजी दुपारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर पवार हा मडगाव गोवा येथून काम करून घरी आला होता. त्याने सोबत आणलेले मद्य प्राशन करून तो झोपला होता. रात्री त्याला उलट्या जुलाब व्हायला लागले. त्यावेळी त्याच्या भावाने विचारले असता त्यांनी दारूच्या नशेत तणनाशक प्राशन केल्याचे सांगितले. त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.