
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 20 एप्रिल 2023 रोजी दुपारी 01.00 वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन व विमानाने रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 01.45 वाजता विमानाने रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय महिला रुग्णालय, रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 02.00 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाहणी व आढावा. (स्थळ : शासकीय महिला रुग्णालय, रत्नागिरी) दुपारी 02.30 वाजता गाळ काढणे संदर्भात आढावा बैठक. (स्थळ : शासकीय महिला रुग्णालय, रत्नागिरी) दुपारी 03.00 वाजता पत्रकार परिषद (स्थळ : शासकीय महिला रुग्णालय, रत्नागिरी) दुपारी 03.30 वाजता जिजामाता उद्यान येथील ॲक्वॅरियमची पाहणी (स्थळ : थिबा पॉईंट जवळ, रत्नागिरी). सांयकाळी 05.30 वाजता रत्नागिरी विमानतळ येथून विमानाने मुंबई कडे प्रयाण.