
रत्नागिरी काँग्रेस उपाध्यक्ष हारिस शेकासन, शहर अध्यक्ष रमेश शहा यांनी टिळक भवन येथे घेतली प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची घेतली भेट
रत्नागिरी:महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांची रत्नागिरी जिल्हा कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे प्रभारी हारीस शेकासन व रत्नागिरी शहर अध्यक्ष रमेश शाहा यांनी नुकतीच भेट घेतली.
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुनाफ हकीम या वेळी उपस्थित होते. प्रदेश अध्यक्षांना रत्नागिरी शहर व तालुक्याच्या राजकीय परिस्थिती बाबत शेकासन व शाहा यांनी सविस्तर माहिती दिली. प्रदेश सरचिटणिस ॲड हुस्नबानू खलिफे व जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या कुशल नेतृत्वाखाली काम सुरू केले असल्याची माहीती दिली व विधानसभा मतदार संघांतील सर्वांना बरोबर घेवून काम करणार असल्याचे सांगितले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत पक्ष संघटना वाढी साठी प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी मोलाचे मार्गदर्शन करत कामाला लागण्याच्या सुचना दिल्या
www.konkantoday.com