
मनोरुग्ण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला वीस वर्षांची शिक्षा
रत्नागिरी :उपप्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणार्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सलग 5 महिने अतिप्रसंग केल्याप्रकरणात तेथील शिपाई कर्मचार्याला न्यायालयाने मंगळवारी 20 वर्ष सश्रम कारावास आणि 31 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सचिन दिलीप माने (38,रा.मनोरुग्णालय वसाहत जेलरोड,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी कर्मचार्याचे नाव आहे.यातील पिडीत मुलगी बाल कल्याण समितीच्या आदेशाने प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आली होती.तिची काळजी घेण्यासाठी तिच्या आईलाही दवाखान्यात तिच्या सोबत ठेवण्यात आले होेते.तेव्हा आरोपी सचिन माने याने पिडीतेच्या आईशी ओळख वाढवून तिला मुद्दाम कुठेतरी गुंतवून ठेवत असे तसेच जेवण वगैरे आणायला जा असे सांगून पिडीतेवर वारंवार अतिप्रसंग करत होता.
दरम्यान,पिडीतेने याबाबत आपल्या आईला सांगितले.तिने जिल्हा बाल कल्याण समितीकडे धाव घेतल्यानंतर जिल्हा बाल कल्याण समितीने याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक यांना पत्र दिले.त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात सचिन माने विरोधात भादंवि कलम 376 2 (बी),पोक्सो 3/4(2),6 पोक्सो 11/12 आणि बाल न्याय अधिकनियमनुसार गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलिस उपनिरीक्षक मुक्ता भोसले यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड.मेघना नलावडे यांनी 14 साक्षिदार तपासले.त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष पोक्सो न्यायाधिश वैजयंतीमाला ए.राउत यांनी आरोपी सचिन मानेला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 31 हजार 500 रुपयांचा दंड तो न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड काँस्टेबल सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.