
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी विद्यार्थ्याशी साधला दिलखुलास संवाद
गुरूवर्य जोग संजीवन गुरूकुलच्या छंदवर्गास प्रारंभ
रत्नागिरी- पटवर्धन हायस्कुलच्या गुरूवर्य रा. पु. जोग संजीवन गुरूकुलच्या छंदवर्ग उपक्रमातील व्यक्तिपरिचयाव्दारे रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला.
गुरूकुलच्या छंदवर्ग उपक्रमास दि. १७ एप्रिल रोजी प्रारंभ झाला. छंदवर्गाच्या पहिल्याच दिवशी भेळ तयार करणे व व्यक्तीपरिचय हे कार्यक्रम पार पडले. यावर्षी व्यक्तीपरिचयासाठी रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरूवातील अध्यापक सुनिल पवार यांनी डॉ. फुले यांचा थोडक्यात परिचय करून दिला. त्यानंतर त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून गुरूकुलच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गुरूकुलचे प्रबंधक मनोज जाधव, मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक वसंत आर्डे, अध्यापिका वीणा पाखरे उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना डॉ. फुले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत माहिती दिली. यावेळी डॉ. फुले यांनी एक झाड लावून त्याचे वर्षभर संवर्धन करून पर्यावरण वाचविण्याचे विद्यार्थ्याना आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अध्यापिका श्रीम. भावे यांनी प्रकट केले.
