चिपळूणात मेडिकलमध्ये पाकीटमारी
चिपळूण :शहरातील मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाचे पाकीट मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेवर संशय व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबतची फिर्याद चिपळूण पोलिसांत दाखल झाली आहे. एक महिला ग्राहक चिपळूण मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी येऊन काऊंटरजवळ औषधे असता महिलेच्या पाठीमागील एका महिलेने पर्स पळवून त्यातील ५ हजार ६५० रुपये व कागदपत्रे लांबवली आणि पर्समधील पाकीटही चोरले. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.