लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक
रत्नागिरी : घटस्फोटीत महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केली आहे. महेश शांताराम बारगुडे (वय ३८, रा. वाकवली, दापोली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना ऑगस्ट २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही घटस्फोटीत आहे. मागील वर्षी तिची विवाह संकेतस्थळावरील संशयिताशी ओळख झाली. त्या वेळी त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. तसेच त्याने महिलेशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या वेळी पीडित महिलेने संशयित याच्याशी लग्न करण्याचा तगादा लावला; मात्र संशयित महेश तिला वारंवार उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्याने लग्नास नकार दर्शवल्याने पीडितीने पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.