सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी
रत्नागिरी:सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी सरपंच सतीश थुळ, उपसरपंच चंद्रकांत मालप, सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोर्ये, सदस्य अजय काताळे, निकिता शिगवण, ममता बंडबे, समिक्षा घाटे, अनिल बैकर, सचिव. श्रीकांत कुळ्ये, संजय बैकर सर, मुख्याध्यापक सुभाष पालयेसर, कांबळे मॅडम, अंगणवाडी सेविका चित्रा थुळ, कमल मालप, संगिता मोर्ये व जिल्हा परिषद मराठी शाळा सत्कोंडीचे विद्यार्थी उपस्थित होते
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केल्या आणि विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली नंतर कांबळे मॅडम, अरुण मोर्ये, संजय बैकर, सतीश थुळ यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालये सर, व श्रीकांत कुळ्ये यांनी केले.