संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला मिळाले आय एस ओ मानांकन प्रमाणपत्र
रत्नागिरी…. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने सामाजिक कार्य करीत असणारी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेला त्यांचे सुयोग्य नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि उल्लेखनीय सेवा या निष्कर्षावर आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना [ISO] ने संस्थेला आज आय एस ओ हे प्रमाणपत्र मिळाले आहे.गेल्या 5 वर्षात संस्थेने रत्नागिरी जिल्हातच नव्हे तर संपूर्ण कोकणात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून कोरोना काळातील कामगिरी वर समाजातून आणि शासकीय स्तरावर प्रशंसा ही होत आहे.रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण मदत केंद्रातून सातत्याने दिवसरात्र ही संस्था गोरगरीब रुग्णांना व नातेवाईक यांना मार्गदर्शन व मदत करीत आहे.या यशामागे दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक तसेच सर्व स्टाफ ,संस्थेचे सर्व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी सांगितले.
संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला मिळालेल्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.