“ओवी” च्या प्रोसेसर साठी मदत करणाऱ्यांचे “आस्था “ने व्यक्त केले ऋण..
रत्नागिरी:ओवी भिकाजी ओर्पे या कर्णबधिर मुलीचे कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या कानाचा प्रोसेसर प्रवासा दरम्यान हरवला होता . त्यामुळे तिला ऐकु यायचे बंद झाले होते. खूप शोध घेऊन ही प्रोसेसर सापडला नाही. त्यामुळे ओवीच्या नवीन प्रोसेसर साठी रक्कम उभी करायचे ठरविले व मदतीसाठी आवाहन केले. हे आवाहन रत्नागिरी खबरदार चे श्री. हेमंत वणजु यांनी खूप संवेदनशीलतेने घेतले. श्री.वणजू यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या सर्व मीडिया ग्रुप वर मदतीसाठी आवाहन केले. बघता बघता रत्नागिरीतील व्यापारी,शिक्षक, दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला व रक्कम जमू लागली. त्यातून श्री. हेमंत वणजुंना लालचंद सराफचे श्री.मनोज जैन यांनी सांगितले की आता उर्वरित रक्कम मी देतो. प्रोसेसर ऑर्डर करण्यात आले. ज्या गुगल पे अकाउंट वर देणगीदारांना मदत देण्याचे आवाहन केले होते ते अकाऊंट देखील लॉक केले आहे.
सदर प्रोसेसर घेऊन तो “कार्यान्वित” करण्यासाठी खास मुंबईहून ऑडीओलॉजिस्ट श्रीम.प्राजक्ता भोगटे मॅडम आल्या होत्या. श्री हेमंत वणजु व श्री. मनोज जैन यांच्या हस्ते ओवी व तिच्या पालकांना प्रोसेसर देण्यात आला याप्रसंगी श्री.हेमंत वणजू, श्री. मनोज जैन, रत्नागिरी व्यापारी महासंघ यांच्यासह अनेक ज्ञात,अज्ञात देणगीदारांनी ओवीच्या प्रोसेसर साठी आर्थिक मदत केली त्यासाठी तिच्या पालकांनी व आस्थाच्या वतीने सुरेखा पाथरे यांनी ऋण व्यक्त केले.
अशा प्रकारच्या बालकांच्या समस्या व त्यांच्या आरोग्याचा हक्क विचारात घेता शासनाने अशा बालकांच्या एकच नव्हे दोन्ही कानाच्या शस्त्रक्रिया ,प्रोसेसर अद्ययावत करणे , दुरुस्ती, स्पीच थेरपी इत्यादीसाठी आर्थिक तरतूद करावी. ही मागणी माध्यमांनी शासनापर्यंत पोहोचवावी अशी विनंती श्रीमती सुरेखा पाथरे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पत्रकार बंधू भगिनींना “कॉक्लियर इम्प्लांट “बाबतची माहिती दिली. पत्रकार मंडळींनी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया झालेल्या पालकांशी संवाद साधुन समस्या जाणुन घेतल्या.
आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी च्या माध्यमातून श्रीम. सुरेखा पाथरे,श्री. संकेत चाळके, श्रीम. संपदा कांबळे यांच्या श्रवण बाधित दिव्यांगांसाठीच्या कार्याचा ऑडिओलॉजिस्ट श्रीम.प्राजक्ता भोगटे यांनी गौरव केला व देणगीदारांप्रती आदर व्यक्त केला.