भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्रबोधन यात्रा
रत्नागिरी:अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अभाअंनिस)तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्रबोधन यात्रा 14 एप्रिल पासून आयोजित करण्यात आली आहे. अभाअंनिसचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन महाराष्ट्र शासनाचा जादूटोणाविरोधी कायदा सहप्रयोग समजावून सांगणार आहेत.
आपल्या परिसरात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर सहप्रयोग व्याख्यान देण्यात येईल. यासोबतच कायद्यासंदर्भातील पोस्टर प्रदर्शन, पुस्तक विक्री, सभासद नोंदणी आणि एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी अॅड. योगेश पवार, शांताराम भुरवणे, मिलिंद कडवईकर, सदुप्पा कांबळे, सचिन तांबे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.