खेड येथे ट्रक – मारुती कारच्या अपघातात तिघांचा मृत्यू
दोन लहान बालकांचा मृत्यू
खेड :मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ट्रक व मारुती इस्टिलो कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान बालकांसह एका वृद्धेचा समावेश आहे. तसेच अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. मुंबईहून देवगड या मूळ गावी जात असताना तावडे कुटुंबियांवर काळाने घाला घातला.
रित्या दर्शन तावडे ( 6 महिने), रिवान दर्शन तावडे (6 वर्षे), वैशाली विजय तावडे (72, सध्या सर्व रा. बोरिवली, मुळचे-देवगड) अशी मृतांची, तर श्वेता तावडे व अक्षय तावडे अशी जखमींची नावे आहेत. तावडे कुटुंबिय मारुती इस्टिलो कारमधून बोरिवली येथून कोकणातील देवगडला जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला आहे. आपल्या 2 निरागस बालकांच्या जाण्याने धक्का बसला.