चिपळूण मोरवणे येथे शासकीय इतमामात सुभेदार अजय ढगळे यांच्यावर अंत्यसंस्कार
रत्नागिरी:- भारत-चीन सीमेवर देश सेवा बजावताना शहीद झालेले सुभेदार अजय ढगळे यांना चिपळूण येथे त्यांच्या गावी रत्नागिरी -रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांनी उपस्थित राहून मानवंदना दिली.
भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागची रेकी करण्यासाठी गेलेले मोरेवणे गावचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे देशसेवा करत असताना शहीद झाले. शहीद अजय ढगळे हे कारगील याआधी झालेल्या लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या टिममध्ये देखील होते. यावेळी शहीद अजय ढगळे यांना चिपळूण येथिल त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंतसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार, माजी आमदार सदानंद चव्हाण आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.