रत्नागिरी उप परिसर एन एस एस विभागाचे निवासी शिबिर संपन्न
रत्नागिरी –चरित्रकार पद्मभूषण डॉक्टर धनंजय किर रत्नागिरी व उप परिसरातील एमएसएस विभागाअंतर्गत श्रमसंस्कार निवासी शिबिर घेण्यात आले. या सात दिवसीय शिबिरामध्ये प्रार्थना योगासात्र, मेडिटेशन, श्रमदान बौद्धिक खेळ, समाजभान, उत्स्फूर्त वकृत्व, व्याख्यान सत्र, अवकाश निरीक्षण, जैवविविधता नोंद, स्वच्छता सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रमांचा समावेश होता. शिबिर कालावधीत श्रमदानदरम्यान शिळ गावातील शाळा, अंगणवाडी, पोहोच रस्ता, मंदिरे यांची स्वच्छता करण्यात आली.
शिबिरात लोकजैवविविधता नोंदवहीचे काम हाती घेत शीळ गावातील वृक्ष संपदा, सरपटणारे प्राणी, पक्षी, शेतीची वाढ, बागायती शेती पिकांचे प्रकार आदींच्या दररोज नोंदी करण्यात आल्या. या प्राथमिक स्तरावरील माहितीचे संकलन करण्यात आले. जैवविविधता नोंदवहीमध्ये या माहितीचा निश्चित उपयोग होणार आहे.
दर दिवशीच्या व्याख्यान सत्रात स्वयंसेवकांना नवोदित उद्योजकांना व्यवसायाची संधी, आनंदी जीवन, आपत्ती व्यवस्थापन, शिवकालीन किल्ले व्यवस्थापन, भारतीय सौर दिनदर्शिका, भावनिक भागांक, भविष्यातील आव्हाने, वेद खगोलाचा अशा अनेक विविध व्याख्यानाद्वारे महत्त्वपूर्ण व वैविध्यपूर्ण माहिती मिळाली. शिबिरास उद्योजिका पल्लवी सावळे, प्रा. उमेश सावंत प्रा डॉ. मोहम्मद गनी, प्रा. नीनाद तेंडुलकर, श्री सुमित प्रतिभा संजय, प्रा. डॉ. विवेक भिडे, ऍड संध्या सुखठणकर, प्रा. डॉ सोनाली कदम, प्रा. बाबासाहेब सुतार आधी व्याख्याते म्हणून लाभले होते.
शिबिरा सहकार्य करणाऱ्या मिरजोळे ग्रामपंचायत येथील सर्व कर्मचाऱ्यांना रत्नागिरी उप परिसरातर्फे सन्मानित करण्यात आले. शिबिराच्या समारोह कार्यक्रमात गोखटे जवळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. पी. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोह समारंभाचे अध्यक्ष संचालक डॉ किशोर सुखटणकर यांनी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री गजानन गुरव यांचा सन्मान केला व शिबिरा सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
संपूर्ण शिबिर नियोजनात सहाय्यक कुलसचिव श्री अभिनंदन बोरगावे यांचे मार्गदर्शन मिळाले. शिबिरात सहभागी स्वयंसेवकांनी आपले शिबिरातील अनुभव व्यक्त केले. स्वच्छता श्रमसंस्कार व्यक्तिमत्व विकास जैवविविधता नोंद या उद्दिष्टांवर आधारित निवासी शिबिराच्या पूर्ततेबद्दल संचालकांनी एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. सोनाली मेस्त्री प्रा. डॉ विजय गुरव, सुरज पाटील, तुषार शेंडे व एनएसएस स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.