
कर सल्लागार असोसिएशनची कॉन्फरन्स “गोवा” येथे यशस्वी आयोजन
रत्नागिरी : कर सल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा यांनी कंडोलिम, गोवा येथे “रेसिडेन्शियल रिफ्रेशर कोर्स” चे (RRC) आयोजन केले होते. या RRC ला १३० सदस्यांनी सहभाग घेतला.
मनोज जोशी (IRS) प्रिन्सिपल कमिशनर ऑफ इनकम टॅक्स व सरप्रितसिंग गिल (IAS) कमिशनर स्टेट टॅक्स गोवा, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते RRC चे उद्घाटन झाले. प्रमुख व्यक्ते म्हणून भारतातील नामांकित सीए. बिमल जैन, ॲड. दिनेश तांबडे, कर सल्लागार संतोष शर्मा, सीए. संजय व्हनबट्टे या व्यक्त्यांनी सदस्यांना जीएसटी व आयकर विषयक ज्ञानसत्रे घेऊन सदस्यांना मार्गदर्शन केले.
याचबरोबर तुषार केळकर (योगतज्ञ) यांनी सदस्यांना योगा विषयक प्रात्यक्षिक करून Healthy -Life Style बद्दल मार्गदर्शन केले. या रिफ्रेशर कोर्सला गुड्स अँड सर्विस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र , ऑल गोवा टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन , महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन , गुड्स आणि सर्विस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सिंधुदुर्ग , गुड्स आणि सर्विस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सातारा , टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन परभणी , रत्नागिरी ब्रँच ऑफ डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआय इ. कर सल्लागार संघटनांचा पाठिंबा मिळाला.
RRC यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सीए. वरदराज पंडित, उपाध्यक्ष राजेश गांगण, सचिव सीए. वैभव देवधर, खजिनदार सीए. . अभिजित पटवर्धन, ॲड. उज्जल बापट, सीए. मंदार देवल, सीए. मंदार जोशी, राजेंद्र भावे, . चंद्रशेखर साप्ते, ॲड रविंद्र साळवी, सीए. चैतन्य वैद्य, सीए. ऋषिकेश फडके, सीए. मंदार गाडगीळ, सीए केदार करंबेळकर, सीए. अभिजित चव्हाण, सीए मंदार जोशी , सीए. कौस्तुभ दाबके इत्यादीनी अथक मेहनत घेतली. संस्थेने प्रथमच जिल्ह्याबाहेर तसेच महाराष्ट्र बाहेरही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. RRC ची सांगता ॲड. अभिजीत बेर्डे व अध्यक्ष सीए वरदराज पंडित यांच्या मनोगताने करण्यात आली