
वाहतूक पोलिसाला धमकी, संशयितावर गुन्हा
रत्नागिरी : शहरातील मिऱ्या-नागपूर मुख्यरस्त्यावरील साळवी स्टॉप येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकिय कामात अडथळा केला या प्रकरणी संशयितावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश चंद्रकांत खेत्री (पत्ता समजून येत नाही) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (ता. २६) सायंकाळी सहाच्या सुमारास मिऱ्या-नागपूर मुख्यरस्त्यावर साळवीस्टॉप येथे घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहतूक शाखेचे पोलिस शिपाई प्रशांत बंडबे हे साळवी स्टॉप येथे रविवारी चार ते आठ यावेळात सेवा बजावत असताना संशयित खेत्री रिक्षा घेऊन आले. रिक्षात नरेद्र बिरादार, विक्रांत शिंदे हे देखिल होते. रिक्षातून उतरुन संशयिताने तू मागे माझ्या भावाचे रिक्षाचे फ्रंट सीटचा मोबाईवर फोटो का काढला असे पोलिस प्रशांत बंडबे यांना विचारणा करुन शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी पोलिस शिपाई बंडबे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.