
खारवी समाज विकास पतसंस्थेच्या सौ.दीप्ती देवेंद्र कोळथरकर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या बेस्ट डायरेक्टर, सक्षम सहकार, सक्षम महिला पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम सहकार , सक्षम महिला पुरस्कार बेस्ट प्यून ते बेस्ट अध्यक्ष अशा विविध पदांवर पतसंस्थामधून काम करणाऱ्या महिलांकरिता पुरस्कारांचे वितरण. दि.२४ मार्च,२०२३ रोजी नाशिक येथे करण्यात आले होते.
अल्पावधीतच सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेली खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौ.दीप्ती कोळथरकर यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या बेस्ट डायरेक्टर,सक्षम सहकार,सक्षम महिला या पुरस्कार ने नाशिक येथे भारती पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या शुभहस्ते व काकासाहेब कोयटे, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंचावर मा. भारती पवार व काकाससाहेब कोयटे यांच्या सह, आशाताई शेलार,बंकर व अभिनेत्री,देवयानी फरांदे, आमदार नाशिक मध्य,सीमाताई हिरे, आमदार नाशिक पश्चिम,
रूपालीताई चाकणकर,अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोग या उपस्थित होत्या.
सौ दीप्ती देवेंद्र कोळथरकर या संस्था स्थापनेपासूनच डायरेक्टर म्हणून यशस्वी पणे जबाबदारी पार पाडत आहेत.आज त्या दाभोळ शाखेच्या यशस्वी पालकत्वाच्या भूमिकेत कार्यरत आहेत. दीप्ती ताई अंगणवाडी सेविका म्हणून 22 वर्षे सेवा करत आहेत.सामाजिक दृष्ट्या सरस्वती महिला मंडळा च्या १० वर्ष सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.त्याच बरोबर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दाभोळ मास्टर ट्रेनर -२ वर्ष. सहकार क्षेत्रात सहभाग 27 जानेवारी 2018 पासून आज पर्यंत चार वर्षे पूर्ण. महिला बचत गट मार्गदर्शन 1995 पासून. आध्यात्मिक स्वाध्याय परिवार केंद्र संचालक २०वर्ष कार्यरत. बालसंस्कार केंद्र संचालक 15 वर्ष. कार्यरत आहेत.
खारवी समाज विकास नागरी सहकारी संस्थेच्या आजच्या प्रगतीमध्ये सौ.दीप्ती कोळथरकर यांनी लक्षवेधी काम केलेले आहे.
दीप्ती ताईंचे संस्थेच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.समाजातील सर्वच स्थरातून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.