मागून येणाऱ्या वाहनाकडे दुर्लक्ष करत कारचा दरवाजा उघडल्याप्रकरणी चालकावर गुन्हा
रत्नागिरी :शहरातील गोडबोले स्टॉप येथे मागून येणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करून कारचा दरवाजा उघडल्याने रिक्षाचा अपघात झाला होत़ा. या अपघातात रिक्षामध्ये मागे बसलेले दोघे जण जखमी झाले होत़े. यापकरणी निष्काळजीपणे कारचा दरवाजा उघडल्याप्रकरणी अज्ञात कारचालकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा.
मुजीब सुलेमान सय्यद व मसुदा मुजीब सय्यद (ऱा उद्यमनगर रत्नागिरी) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुजीब व त्यांची पत्नी मसुदा हे 28 फेबुवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास इम्तियाज यांच्या रिक्षातून गोडबोले स्टॉप येथून जात होत़े. यावेळी रस्त्याकडेला असलेली कार (एमएच 07 एबी 1594) मध्ये चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या सोनल देसाई (ऱा सिंधुदुर्ग) यांनी कारचा दरवाजा उघडल़ा.
कारचा दरवाजा उघडताच त्याची धडक इम्तियाज यांच्या रिक्षाला बसून अपघात झाल़ा. यामध्ये मुजीब व मसुदा सय्यद हे जखमी झाल़े याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरूद्ध भादंवि कलम 337 व मोटार वाहन कायदा कलम 122,177 नुसार गुन्हा दाखल केल़ा.