
प्रथमच पदाधिकाऱ्यांविना सादर होणार जिल्हा परिषदेचे बजेट
रत्नागिरी :जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकीय राज सुरु असून सन 2023-24 या वर्षासाठीचा जिल्हा परिषद स्व उत्पन्नाचा आर्थिक बजेट कधी सादर करणार आणि ते किती असणार, याची उत्स्ाुकता असणार आहे. प्रथमच पदाधिकारीविना हे बजेट सादर करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी आपले स्वतःचे आर्थिक बजेट सादर करते. यावर्षी मात्र हे बजेट पदाधिकारीविना सादर करावे लागणार आहे. कारण वर्षभरापूर्वी पदाधिकार्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे. सध्या प्रशासकराज सुरु आहे. जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सन 2023-24 चा अर्थसंकल्प हा ते सादर करणार आहेत.
गतवर्षी पदाधिकारी असल्याने सर्वसाधारण सभा घेवून मार्च पहिल्या आठवड्यात शामराव पेजे सभागृहात बजेट सादर करण्यात आले होते. 22 कोटींचे हे बजेट होते. यावर्षी या बजेटमध्ये वाढ होणार की नाही ? याबाबत उत्स्ाुकता असणार आहे. साधारण 27 किंवा 28 मार्चला हे बजेट सादर होईल, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.